Mumbai, फेब्रुवारी 7 -- Sebi Action against Asmita Patel : भारतीय शेअर बाजारातील 'ऑप्शन क्वीन' आणि शी-वुल्फ म्हणून ओळखली जाणारी अस्मिता पटेल हिच्यावर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड तथा सेबीनं मोठी कारवाई केली आहे. सेबीनं तिची कंपनी ग्लोबल स्कूल ऑफ ट्रेडिंगकडून ५३.६७ कोटी रुपये जप्त केले आहेत.

अस्मिता पटेल हिच्याकडून जप्त करण्यात आलेली रक्कम हा २०२१ ते २०२४ या सुमारे तीन वर्षांच्या कालावधीत विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या शुल्कापोटी मिळालेल्या एकूण १०४ कोटी रुपयांच्या रकमेचा भाग आहे. उर्वरित रक्कमही का जप्त करू नये, अशी विचारणा सेबीनं केली आहे.

अस्मिता पटेल हिच्या युट्यूब चॅनेलचे ५२६००० सबस्क्रायबर्स आहेत. ग्लोबल स्कूल ऑफ ट्रेडिंग नावानं ती एक कंपनीही चालवते. शेअर बाजाराशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नावाखाली बेकायदेशीर गुंतवणुकीचा...