भारत, फेब्रुवारी 15 -- Ashutosh Gowariker Marathi Movie: बॉलिवूडमधील अतिशय हिट चित्रपट देणारे दिग्दर्शिक म्हणून आशुतोष गोवारीकर ओळखले जातात. त्यांनी 'लगान', 'स्वदेस', 'जोधा अकबर' अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केले. काही कलाकारांचे रातोरात आयुष्य बदलले. आज १५ फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचा मराठी चित्रपट करतानाचा एक किस्सा आपण जाणून घेणार आहोत.

आशुतोष यांनी प्रियांका चोप्रानं निर्मिती केलेल्या व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटात भूमिका साकारली होती. जवळपास १८ वर्षांनंतर आशुतोष गोवारीकर हे मराठी चित्रपटासाठी काम करत होते. या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी महत्त्वाच्या भूमिकेत होता. जितेंद्रने आशुतोष यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला होता. हा सेटवरचा ...