Mumbai, एप्रिल 8 -- Ashish Shelar meets Salman Khan Family : मुंबई भाजपचे अध्यक्ष व वांद्रे पश्चिम विधानसभेचे आमदार आशिष शेलार यांनी नुकतीच अभिनेता सलमान खान, पटकथाकार-लेखक सलीम खान यांची भेट घेतली. शेलार यांनी खान कुटुंबीयांसोबत स्नेहभोजनही घेतलं. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

आशिष शेलार यांनी स्वत: 'एक्स' वर फोटो पोस्ट करून या भेटीची आणि स्नेहभोजनाची माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू आहे. दिवसागणिक प्रचाराचा जोर वाढत आहे. मुंबई देखील यास अपवाद नाही. मुंबईत बहुतेक पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. तर, काही मतदारसंघात अद्यापही उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत. आशिष शेलार यांचा विधानसभा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघात येतो, त्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले...