भारत, फेब्रुवारी 6 -- राजस्थानातील जोधपूर येथील आसाराम बापूच्या वादग्रस्त आश्रमात बापूच्या तीन सहकाऱ्यांनी मिळून एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. एका ५६ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी या आश्रमातील विधी विभागाच्या प्रमुखासह व्यवस्थापनातील अन्य तीन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोधपूरचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या आदेशानंतर आसाराम बापूंच्या जोधपूर येथील आश्रमाचे विधी प्रमुख पंकज मिरचंदानी ऊर्फ अर्जुन, व्यवस्थापन कर्मचारी चेतनराम साहू, सचित भोला आणि जीवन यांच्याविरोधात बोरानाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला मूळची मध्य प्रदेशातील आहे. जोधपूरमध्ये पाल रोडवर आसाराम बापूचे मोठे आश्रम आहे. या आश्रमात ही महिला वारंवार जात होती. ग...