Mumbai, नोव्हेंबर 30 -- Arvind Kejriwal News: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि 'आप' पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात पदयात्रेदरम्यान ही घटना घडली. एका व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांच्यावर ज्वलनशील लिक्विड फेकण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. मात्र घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे.

दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर मध्ये पदयात्रेदरम्यान हा प्रकार घडला, जिथे एका व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांच्यावर ज्वलनशील लिक्विड फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेतील आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्लीत माजी मुख्यमंत्री सुरक्षित नाही, ...