भारत, मार्च 2 -- Article 370 Box Office Collection Day 8: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम अभिनित 'आर्टिकल ३७०' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आदित्य झांबळे दिग्दर्शित आणि आदित्य धर निर्मित या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची फौज दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक आठवडा झाला असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. चित्रपटाने आठव्या दिवशी किती कमाई केली? चला जाणून घेऊया...

'आर्टिकल ३७०' या चित्रपटात यामी गौतम, प्रियामणी आणि अरुण गोविल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने ५.९ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ७.४ कोटी रुपये कमावले. आता आठव्या दिवशी चित्रपटाने २.७५ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाने गेल्या आठ दिव...