New Delhi, फेब्रुवारी 1 -- Nirmala Sitharaman Budget 2025 Speech Live : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं बहुप्रतिक्षित अर्थसंकल्पीय भाषण सुरू झालं आहे.

एमएसएमई क्षेत्राचा विकास व्हावा अशी सरकारची इच्छा आहे. एक कोटीहून अधिक नोंदणीकृत एमएसएमई आहेत. याच्याशी करोडो लोकांचा रोजगार जोडला गेला आहे. त्यांना अधिक पैसे मिळावेत म्हणून त्यात अडीचपट वाढ करण्यात येत आहे. यातून तरुणांना रोजगार मिळेल.

> बिहारमधील लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मखाना बोर्डाची स्थापना करण्यात येईल. मत्स्य उत्पादन क्षेत्रात भारत अग्रेसर आहे. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी किसान कार्ड देण्यात येणार आहे - निर्मला सीतारामन

> प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेसारखे कार्यक्रम राबवले जात असून शेतीवर विशेष लक्ष दिलं जात आहे. आमचं लक्ष पायाभूत सुविधांवर आहे. कृषी उत्पादकता वाढ...