New Delhi, फेब्रुवारी 1 -- Nirmala Sitharaman Budget 2025 Speech Live : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं बहुप्रतिक्षित अर्थसंकल्पीय भाषण सुरू झालं आहे. उद्योग-व्यवसायासह मध्यमवर्गीयांना या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पाहूया क्षणोक्षणीचे अपडेट्स.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोठी घोषणा केली. यापुढं १२ लाखांपर्यंत अजिबात इन्कम टॅक्स लागणार नाही.

जेष्ठ नागरिकांच्या ठेवींवरील करमुक्त व्याजाची मर्यादा ५०,००० हजारांवरून १ लाख रुपये होणार

भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरील टीडीएसची वार्षिक मर्यादा २.४० लाखांवरून ६ लाख करण्यात येणार

नवीन इन्कम टॅक्स बिल आणण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. नवीन विधेयक सध्याच्या कायद्याच्या जवळपास निम्म्यासह स्पष्ट आणि थेट मजकुरात असेल. ते समजून घेणं सोपं होईल आणि कर निश्चितता सोपी होईल व...