Mumbai, फेब्रुवारी 10 -- Audience Angry On Appi Aamchi Collector : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेमध्ये सध्या एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अमोलच्या आजारपणामुळे ही कथा आता एक वेगळंच वळण घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील मुख्य पात्र अर्थात अप्पीचा एक मोठा अपघात झाल्याचे दाखवण्यात आले होते. या अपघातानंतर अर्जुन देखील शोकमग्न झालेला. एकीकडे अप्पीचा मृतदेह सापडला नसल्याने, ती जीवंत आहे, असे अर्जुनला वाटत होते. तर, अप्पी आणि अर्जुनचा मुलगा जो आताच मृत्यूच्या दारातून परतला आहे, त्याला देखील आपली आई परत येईल अशी आशा आहे. या दरम्यान आता अप्पी पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात परतणार आहे. मात्र, यासाठी मालिकेत आलेला ट्विस्ट पाहून प्रेक्षक संतापले आहेत.

या मालिकेच्या नव्या ट्रॅकमध्ये दाखवण्यात आले आ...