Mumbai, फेब्रुवारी 11 -- Anna Hazare On Uddhav Thackeray : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, तर दुसरीकडे भाजपने आपली संपूर्ण यंत्रणा दिल्ली निवडणुकीत उतरवली होती. आरोप-प्रत्यारोपांनी दिल्लीसह संपूर्ण देशातील राजकीय वातवरण तापलं होतं. त्यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावरही प्रतिक्रिया दिली होती. यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अण्णा हजारेंवर टीका करत महाराष्ट्रात व केंद्रात भाजपच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत असताना अण्णा कूसही बदलत नव्हते, असा टोला लगावला. यावर अण्णा हजारे यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आहे.

Soybean: केंद्राकडून सोयाबीन ख...