Mumbai, फेब्रुवारी 14 -- Ankita Lokhande in Legal Trouble: अभिनेत्री रोझलिन खानने अंकिता लोखंडेविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. एका मुलाखतीदरम्यान रोझलिनने हिना खानच्या कॅन्सरला पब्लिसिटी स्टंट म्हटले होते. या मुलाखतीचा व्हिडिओ पोस्ट करत अंकिता लोखंडेने रोझलिनला 'चीप' असे म्हटले. इतकेच नाही तर, तिचा नवरा आणि उद्योगपती विकी जैन हिनाला भेटायला गेला तेव्हा काय घडले? हेही तिने सांगितले.

रोझलिनने हा खटला दाखल करण्यामागचे कारण स्पष्ट करत इन्स्टाग्रामवर कागदपत्रे शेअर केली. 'हिना खानची १५ तासांची शस्त्रक्रिया आणि तिच्या उपचारात येणाऱ्या अडचणींवर मी प्रश्न चिन्ह उपस्थित केले. हिनाने माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. रूग्णाची गुप्तता पाळून रुग्णालयही गप्प बसले. परंतु, आता मला अनोळखी लोकांच्या धमक्या येत आहेत. माझ्या पेजवर घाणेरड्या कमेंट्...