देवभूमि द्वारका (गुजरात)। एएनआई, एप्रिल 5 -- देशातील सर्वात मोठे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्या भक्ती आणि श्रद्धेसाठी ओळखले जाणारे अनंत अंबानी सध्या गुजरातमधील जामनगर ते द्वारकाधीश मंदिरापर्यंत पदयात्रा काढत आहेत. या पदयात्रेचा आज (५ एप्रिल) आठवा दिवस आहे. त्यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक आणि शेकडो समर्थक आणि भाविक आहेत. यावेळी ते आणि पदयात्रेत सहभागी लोक हनुमान चालीसा पठण करताना दिसले. अनंत अंबानी १० एप्रिल ला आपला वाढदिवस द्वारकेत साजरा करणार आहेत.

अनंत अंबानी म्हणाले, 'पदयात्रा आमच्या घर जामनगर ते द्वारका अशी आहे. गेल्या ८ दिवसांपासून हे सुरू असून येत्या २-४ दिवसात आम्ही पोहोचू. माझा प्रवास सुरूच आहे. भगवान द्वारकाधीश आम्हाला आशीर्वाद देवो...