New delhi, फेब्रुवारी 28 -- Amrit Bharat Train : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) पुढील महिन्यात आणखी एक अमृत भारत ट्रेन देणार आहे. ही नवी ट्रेन सध्याच्या अमृत भारत ट्रेनसेटचे मॉडर्न व्हेरिएंट असेल. रेल्वे मंत्रालयाने पुढील दोन वर्षांत ५० अमृत भारत २.० गाड्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या दिशेने वेगाने काम सुरू आहे. अल्प उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांना डोळ्यासमोर ठेवून अमृत भारत ट्रेनची रचना करण्यात आली आहे. अमृत भारत २.० ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी परवडणारी सेवा पुरवते. तसेच यामध्ये मिळणाऱ्या सुविधांमुळे प्रवासी चांगलेच प्रभावित झाले आहेत.

अमृत भारत ट्रेन २०२३ मध्ये सुरू करण्यात आली होती. यात लांब पल्ल्याचा प्रवास सहज पार केला जातो. यात दोन प्रकार...