भारत, एप्रिल 4 -- Amravati Lok Sabha Constituency News: आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच देशातील अनेक पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आपपल्या मतदारसंघातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार अनेक अश्वासन देऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्‍यान आरोप-प्रत्‍यारोपांनी वातावरण तापले आहे. नवनीत राणा यांनी मतदारांना १७ रुपये किमतीच्‍या साड्या वाटून मेळघाटची बेईज्जती केली, अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.

भाजपने नवनीत राणा यांना अमरावती मतदार संघातून उमेदवारी घोषित केली. परंतु, त्यांच्या उमेदवारीला महायुतीत असलेले बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला. यानंतर बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले....