Mumbai, फेब्रुवारी 8 -- Amitabh Bachchan Viral Post : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा ते आपल्या चाहत्यांसोबत आपले विचार शेअर करताना दिसतात. पण, यावेळी बिग बींनी असे काही लिहिले आहे, जे वाचून त्यांच्या चाहत्यांच्या जीवाला घोर लागला आहे. अमिताभ बच्चन यांनी काल संध्याकाळी एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्यांनी लिहिले की, 'आता जाण्याची वेळ आली आहे'. अभिनेत्याची ही पोस्ट वाचल्यानंतर चाहते त्यांना हे लिहिण्या मागचे कारण विचारत आहेत. काहींनी भावूक होत 'असे बोलू नका', असे म्हटले आहे. तर, तर काही जण बिग बींच्या कामाशी या वाक्याचा संबंध जोडत आहेत.

एका एक्स युजरने अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की, 'कुठे जायची वेळ आली आहे सर?' आणखी एका युजरने लिहिलं की, 'असं लिहू नका सर.' आणखी एका युजरने ल...