भारत, फेब्रुवारी 7 -- तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता. लोकसभेत आम्हाला केवळ जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत बसलो नाही. यावेळी पराभवातून काहीतरी शिकून कष्ट घेतले होते. मेहनत केली होती. लोकसभेत आम्हाला केवळ एक जागा मिळाली. मागे एका लोकसभा निवडणुकीत मलाही माझ्या मुलास निवडून आणता आली नाही. या लोकसभेत पत्नीला निवडून आणता आले नाही. मात्र आम्ही ईव्हीएमला दोष देत बसलो नाही, असा पलटवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर केला आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत संशय व्यक्त केला होता.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तीन महिन्याचा कालावधी लोटला तरी याचे कवित्व काही संपलेले नाही. अजूनही निक...