भारत, जानेवारी 26 -- Viral Video: राज्यात राजकीय नेत्यांचा पाठिंबा असलेल्या कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्य लोकांचा शारिरीक आणि मानसिक छळ केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी काही दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेला काही दिवस उलटले तोच, बाबुराव चांदेरे यांनी आणखी एका व्यक्तीला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. बाबुराव चांदेरे यांनी जमीनीच्या वादातून भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केल्याची माहिती समोर आली. यात विजय रौधळ यांच्या डोक्याला व...