Odisha, जून 2 -- Agni-1 Ballistic Missile : भारताच्या क्षेपणास्त्रातील महत्वाचे हत्यार असणाऱ्या अग्नी १ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. अग्नी १ हे आंतरखंडिय क्षेपणास्त्र आहे. डीआरडीओने १ जून रोजी या क्षेपणास्त्राचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे. यामुळे शत्रू प्रदेशात लष्करी ठाण्याच्या अचूक वेध आता भारताला घेता येणार आहे.

भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ (DRDO डिफेंस रिसर्च अँड डेवेलपमेंट ऑर्गेनायझेशन) ने अग्नी १ या मध्यम पल्ल्याच्या आंतरखंडिय क्षेपणास्त्राचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे. गुरूवारी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडद्वारे या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचं प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

संरक्षण मंत्र...