भारत, जानेवारी 24 -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यादरम्यान एकूण २९ कंपन्यांशी सामंजस्य करार (MoUs) झाले आहेत . त्यातील फक्त १ कंपनी परदेशी आहे, उर्वरित २८ कंपन्यांचे मुख्यालय भारतातच आहे. विशेष म्हणजे, यातील २० कंपन्या महाराष्ट्रात असून, त्यातील १५ कंपन्या मुंबईतल्या आहेत. मुंबईतील कंपन्यांची कार्यालये मुख्यमंत्री कार्यालयाजवळ आहेत. हे लक्षात घेता केवळ सामंजस्य करार करण्यासाठी या कंपन्यांना दावोसला का नेण्यात आले, असा सवाल शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांची केला आहे. आज मातोश्री येथे पत्रकार परिषद ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी यावेळी काही प्रश्न उपस्थित केले. तसेच महाराष्ट्र आणि भारतात होणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकीचे स्वागत आहेच. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फ...