भारत, फेब्रुवारी 7 -- अदानी ग्रुपचेचेअरमन गौतम अदानी यांचा सर्वात लहान मुलगा जीत अदानी याचा विवाह सोहळा शुक्रवारी साधेपणाने पार पडला. या विवाह समारंभानिमित्त गौतम अदानी यांनी १० हजार कोटी रुपये समाजासाठी दान करण्याची घोषणा केली. जगातील सर्वात धनाड्य व्यक्तींपैकी एक असलेल्या अदानींकडून दिलेले हे दान विवध सामाजिक कार्यांसाठी वापरले जाईल.

गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी याचा विवाह दीवा शहा हिच्याशी झाला. या निमित्त गौतम अदानी यांनी मोठी रक्कम दान करण्याची घोषणा केली.मुलाचा विवाह परंपरागत पद्धतीने आणि साधेपणे केला जाईल असे अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी कुंभमेळ्यातील भेटीदरम्यानजाहीर केले होते.

अदानी यांनी समाजसेवेसाठी जाहीर केलेली ही रक्कम वेगवेगळ्या समाजोपयोगी कामांसाठी वापरली जाईल. गौतम अदानी हे जगातील प्रमुख श्रीमंत व्यक...