Mumbai, जानेवारी 14 -- Adani Group Stocks News : गेल्या काही दिवसांपासून घसरत चाललेला शेअर बाजार आज किंचित सावरला. मात्र, काही कंपन्यांच्या शेअर्सनी या किंचित सकारात्मक वातावरणातही मोठी भरारी घेतली. त्यात अदानी समूहातील बहुतेक सर्व कंपन्यांचे शेअर होते. अदानी समूहातील सर्व १० शेअर्सना आज प्रचंड मागणी होती. त्यामुळं हे शेअर १८ टक्क्यांपर्यंत वधारले.

एनएसईवर अदानी पॉवरचा शेअर १९.९९ टक्क्यांनी वधारून ५३९.८५ रुपयांवर पोहोचला. त्याखालोखाल अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर १३.५२ टक्क्यांनी वाढून १०१० रुपयांवर गेला तर, अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर १२.२३ टक्क्यांनी वधारून ७७३ रुपयांवर पोहोचला.

अदानी टोटल गॅसच्या शेअरची किंमत ६.४३ टक्क्यांनी वाढून ६६८.६० रुपये झाली तर एनडीटीव्हीचा शेअरही ६.०७ टक्क्यांनी वधारून १४७.९० रुपयांवर पोहोचला. अदानी समूहाची प्...