Mumbai, जानेवारी 31 -- Adani hidenberg : अदानी समुहासंदर्भात हिडेनबर्गने जाहीर केलेल्या अहवालातील टायमिंग आणि त्याचा नेमका उद्देश यावरच आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शेअर बाजारात अदानी समुहाच्या शेअर्समधून जबरदस्त नफा कमावण्याच्या उद्देशाने हा अहवाल तयार गेला का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हिडेनबर्गचा अहवाल एक आठवड्यापूर्वी जाहीर झाला होता. पण गेल्या आठवड्यात शेअर बाजारात या वृत्ताने अदानी समुहाला आणि शेअर बाजाराला हादरुन सोडले. २४ जानेवारीला जाहीर झालेल्या अहवालानंतर अदानी समुहाच्या सात लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स कोसळले. जगातील अब्जाधीशांच्या यादीतील गौतम अदानींचा क्रमांकही ढासळला. अदानी समुहाने हिडेनबर्गच्या आरोपांचे खंडन करत ४१६ पानांचे उत्तर दिले. यानंतर पुन्हा हिडेनबर्गनेही पलटवार केला. या आरोप प्रत्यारोपांच्या फ...