Mumbai, जानेवारी 27 -- Q3 Results News in Marathi : एसीसी लिमिटेडचा डिसेंबरला (आर्थिक वर्ष २०२५) संपलेल्या तिसऱ्या तिमाहीतील एकत्रित निव्वळ नफा १०३.०६ टक्क्यांनी वाढून १,०९१.७३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ५३७.६३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. अनुक्रमिक, एकत्रित निव्वळ नफा ४४६.८ टक्क्यांनी वाढला आहे.

डिसेंबरच्या तिमाहीत एसीसीचं कामकाजातून एकत्रित उत्पन्न ५२०७.२९ कोटी रुपये आहे. वार्षिक आधारावर ही वाढ ७.२५ टक्के आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ते ४८५५.२२ कोटी रुपये होतं. अनुक्रमे महसुलात १५.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कंपनीच्या एक्स्चेंज फाइलिंगनुसार, डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत व्याज, कर, अवमूल्यन आणि अमोर्टायझेशनपूर्वीचे उत्पन्न (EBITDA) १,११६ कोटी रुपये होतं. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिम...