Mumbai, फेब्रुवारी 4 -- Aaradhya Bachchan Petition : बॉलिवूड कलाकारच नाही तर, त्यांची मुले देखील आजकाल सोशल मीडिया आणि मीडियामध्ये तूफान चर्चेत असतात. बच्चन कुटुंब देखील अशा लोकांपैकीच एक आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंब नेहमीच कॅमेरासमोर चर्चेत असतं. बच्चन कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बातम्यांमध्ये असते. सध्या, बच्चन कुटुंबातील आराध्या बच्चन देखील प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. आराध्या बच्चनशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने गुगलला नोटीस बजावली आहे. हे प्रकरण काय आहे, ते जाणून घेऊया.

आराध्या बच्चनने तिच्या आरोग्याबाबत मीडियाच्या चुकीच्या रिपोर्टिंगबद्दल पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली आहे. आराध्याच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने गुगलला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १७ मार्च रोजी होणार आहे. २०२३ मध्...