Mumbai, फेब्रुवारी 17 -- Microwave Chocolate Brownie Recipe: लहान मुले रोज काहीतरी वेगळं खाण्याचा हट्ट करतात. गोड खाण्याकडे तर त्यांचा फार कल असतो. चॉकलेट आणि त्यापासून बनवलेल्या गोष्टी मुलांना नेहमीच आवडतात. अनेक मोठ्या लोकांनाही चॉकलेट आवडते. याचमुळे रात्रीच्या जेवणानंतर मिठाईसाठी चॉकलेट ब्राउनी बनवू शकता. जेव्हा तुम्हाला गोड मिठाई सारखं खावेसे वाटते तेव्हा तुम्ही पटकन घरी ब्राउनीज तयार करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही आणि वेळही वाया घालवावा लागणार नाही, ही चविष्ट ब्राउनी फक्त ५ मिनिटांत तयार होईल. हे तुम्ही आइस्क्रीम किंवा हॉट चॉकलेटसोबत खाऊ शकता. चॉकलेट ब्राउनी बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.

मेल्ट केलेलं चॉकलेट, २ चमचे मेल्ट केलेलं बटर, चवीनुसार पिठीसाखर, १ वाटी मैदा, १ कप दूध, ३-४ बारीक चिरलेले अक्रोड, काही ...