भारत, जून 4 -- आयपीएल २०२५ अनेक अर्थांनी खास होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पहिल्यांदाच चॅम्पियन ठरला. त्याने अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. सलामीवीर नसलेल्या फलंदाजाने पहिल्यांदाच ७०० पेक्षा जास्त धावा केल्या. आयपीएलच्या दोन फायनलमध्ये पहिल्यांदाच एका खेळाडूने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. पाहूयात १८ व्या सीझनमध्ये असे १८ खास पराक्रम जे आयपीएल इतिहासात आतापर्यंत झाले नव्हते. विशेष म्हणजे १८ हा विराट कोहलीचा लकी नंबर आहे. हा त्याचा जर्सी नंबर असून आयपीएलच्या १८ व्या सीझनमध्ये आरसीबीने जेतेपद जिंकण्याचा दुष्काळ संपवला.

१- आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकले

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले. याआधीही त्याने ३ वेळा अंतिम फेरी गाठली होती, पण तीनही वेळा त्याला पराभवाला सामोरे जावे ल...