Mumbai, मे 8 -- मराठी मनोरंजन विश्वातील 'हँडसम हंक' अशी ओळख मिळवणारा अभिनेता गश्मीर महाजनी नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतो. मात्र, यावेळी त्याने एक धक्कादायक खुलासा करत सगळ्यांनाच मोठा शॉक दिला आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे अभिनेत्याचे चाहते चांगलेच काळजीत पडले आहेत. गश्मीर महाजनी याचं वैयक्तिक आयुष्य गेल्या काही महिन्यांपासून चांगलंच ढवळून निघालं आहे. गश्मीरचे वडील अर्थात अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर अभिनेत्याला खूप ट्रोल केलं गेलं होतं. वडिलांना एकटं ठेवल्याबद्दल अनेकांनी त्याला सुनावले होते. मात्र, गश्मीरने नेहमीच आपल्या चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तरं दिली आणि सगळ्यांचे गैरसमज दूर केले. मात्र, आता या दरम्यान आपण आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक खुलासा गश्मीर महाजनी याने केला आहे.

वडि...