New delhi, फेब्रुवारी 3 -- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मतदानाच्या दोन दिवस अगोदर मशिनमध्ये बिघाड झाल्याची भीती व्यक्त केली आहे. १० टक्के मतांमध्ये फेरफार होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. खबरदारी म्हणून त्यांनी अनेक पावले उचलण्याचे सांगितले आहे. 'आप'चे प्रमुख म्हणाले की, त्यांच्या पक्षाने एक वेबसाइट तयार केली आहे, ज्यावर प्रत्येक बूथवरील डेटा अपलोड केला जाईल आणि घोटाळे रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अरविंद केजरीवाल यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून ईव्हीएमबद्दलची आपली भीती आणि त्याला सामोरे जाण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीबद्दल सांगितले. १० टक्के मतांची तफावत असू शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. केजरीवाल म्हणाले, 'मी जिथे जात आह...