भारत, एप्रिल 15 -- मालिकांविश्वांमध्ये सध्या अनेक नवनव्या विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे दिसत आहे. जुन्या मालिका बंद होऊन त्यांची जागा नव्या मालिका घेत असल्याचे चित्र आहे. झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या मालिकेने देखील प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यापूर्वी या कार्यक्रमाचा लेखक, सूत्रसंचालक डॉ निलेश साबळेने रामराम ठोकला होता. त्यानंतर निलेश साबळे एक नवा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या कार्यक्रमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

कलर्स मराठी आता विनोदाचा ॲटमबॅाम्ब फोडण्यासाठी निलेश साबळे सज्ज झाला आहे. त्याचा 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा कार्यक्रम तगडी स्टारकास्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमातून निलेश साबळे, ओमकार भोजने आणि भाऊ कदम हे कलाकार प्रेक्ष...