Pune, मार्च 5 -- १८मार्चपर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा अन्यथा१९ मार्च रोजी मुंबई येथे आंदोलनाचा बॉम्ब टाकू असा इशारा विकांत तुपकर यांनी राज्य सरकारलादिला.क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्राची पहिली राज्य कार्यकारणी बैठक पुण्यात पार पडली.यावेळी तुपकर बोलत होते. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्यास सरकार कितीही बलाढ्य बहुमताचे असले तरी त्यांना गुडघे टेकायला लावू असा इशाराही तुपकर यांनी दिला. यावेळी राज्यभरातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यभरातून शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ तसेच तरुण शेकडो शिलेदार बैठकीसाठी पुणे येथे आले होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी संघटनेची रूपरेषा, भूमिका आणि आगामी काळातील उद्देशाबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांचा आवाज म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटना काम करणार असल्याचे त...