Gurugram, फेब्रुवारी 16 -- Viral News : गुरुग्राममधील एका २४ वर्षीय तरुणीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या एक्स बॉयफ्रेंडला चांगलाच धडा शिकवला. प्रेससीने शिकवलेला धडा हा तरुण कधीही विसरू शकणार नाही. दोघांचेही काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाले होते. या ब्रेकचा बदला तरुणीने घेण्यासाठी प्लॅन रचला. या साठी तरुणीने तरुणीने व्हॅलेंटाईन डे चा दिवस निवडला.

प्रेसिने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅपच्या माध्यमातून बॉयफ्रेंडच्या घरच्या पत्त्यावर एकाच वेळी १०० पिझ्झा मागवले, तेही कॅश ऑन डिलिव्हरीच्या पर्यायाने. अचानक एवढ्या मोठ्या संख्येने एकाच वेळी पिझ्झा आले तेव्हा तिचा एक्स बॉयफ्रेंड हादरला.

पिझ्झा डिलिव्हरी बॉयने ऑर्डर डिलिव्हरी करून पैसे मागितले तेव्हा त्याची परिस्थिती बिकट झाली. एक्सने या ऑर्डरची काहीच माहिती नसल्याचा दावा केल...