भारत, मार्च 22 -- जलरंग चित्रकला ही व्यक्तीच्या जीवनात तणाव निवारक आणि मूड बूस्टर म्हणून काम करून सर्जनशील क्षमतांमध्ये वाढ करत असल्याचं एका सर्वेमधून आढळून आलं आहे. चित्रकलेच्या माध्यमातून अनेकांचा आत्मविश्वास दुणावला असून संयम आणि कला आणि निसर्गाशी सखोल संबंध वाढल्याचे दिसून आले आहे.

नागपूर स्थित जलरंग कलावंत अभिजित बहादुरे याने या सर्वेचं आयोजन केलं होतं. अभिजित हा मेकॅनिकल इंजिनीअर असून त्याने वॉटर कलर आर्टिस्ट क्षेत्रात करिअर केले आहे. अभिजितने १००० हून अधिक विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवली असून यात डॉक्टर, इंजिनियर, अभियंते, बँकर, आयटी तज्ञांचा समावेश आहे. या कार्यशाळांमध्ये येणारे केवळ चित्रकला शिकण्यासाठीच नव्हे तर आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सक्षम होण्याचादेखील यामागे उद्देश्य असतो. चित्रकलेमुळे आपण तणावमुक्त झालो असून ...