भारत, मार्च 13 -- बेळगाव येथील 'लोकमान्य ग्रंथालय' आणि 'बुक लव्हर्स क्लब' यांच्या विद्यमाने नुकतेच मुंबईस्थित पर्यटनतज्ज्ञ आणि 'डिव्हाईन इजिटेटर्स अँड हार्डी' या पुस्तकाचे लेखक उमाकांत तासगावकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे एक विचारमंथनच होते. यावेळी तासगावकर यांनी पुस्तकात तत्कालीन भारतातील, ब्रिटनधील आणि एकूण जगातील परिस्थितीचे विश्लेषण केले आहे.

पुस्तकाचे अनेक पैलू त्यांनी आपल्या भाषणामध्ये उलगडून सांगितले. टिळक उत्तम गणिती व खगोलशास्त्री होते. त्याचप्रमाणे टिळकांची दूरदृष्टी आश्चर्यजनक होती. लोकमान्य टिळकांनी १९१८ साली ब्रिटिश सरकारला २००० पौंडांची देणगी दिली होती. त्या देगणीचा कसा विनियोग झाला आणि भारताचे स्वातंत्र्य लवकर मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी काय प्रयत्न केले हेही त्यांनी आवर्जून सांगितले. सुरुवातीला जोगळेकर या...