भारत, फेब्रुवारी 6 -- पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टीत गेले वर्षभर इस्त्रायली लष्कर आणि हमास संघटनेदरम्यान घनघोर युद्ध सुरू असताना अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक भलतेच वक्तव्य केल्याने अरब देशांत संतापाची लाट उसळली आहे. पॅलेस्टाइनमधील गाझा पट्टीत राहणाऱ्या नागरिकांनी हा भूभाग कायमचा सोडून इजिप्त आणि जॉर्डनमध्ये 'चांगल्या घरांमध्ये' रहायला जायला हवे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिका गाझा पट्टी ताब्यात घेईल. आम्ही त्याची मालकी घेऊ आणि त्या जागेवरील सर्व धोकादायक न फुटलेले बॉम्ब आणि इतर शस्त्रे नष्ट करणे, जागेचे सपाटीकरण करणे आणि नष्ट झालेल्या इमारती पाडणे, त्या इमारती जमीनदोस्त करणे ही जबाबदारी आपली असेल, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अरब देशांत...