Mumbai, एप्रिल 15 -- मराठी मालिकांचा या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. या आठवड्यात अनेक मालिकांनी प्रेक्षकांची वाहवाह मिळवत, टीआरपी शर्यतीतही बाजी मारली आहे. काही जुन्या मालिकांना मात देत नव्या मालिकांनी थेट टीआरपीच्या टॉप ५ यादीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर, काही मालिकांनी त्यातील धमाकेदार आणि रंजक वळणांमुळे पुढचं स्थान पटकावलं आहे. चला तर पाहूया, २०२४च्या १४व्या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट...

गेल्या काही महिन्यांपासून 'ठरलं तर मग' ही मालिका आपलं पहिलं स्थान टिकवून आहे. सध्या या मालिकेत अतिशय रोमँटिक वळण पाहायला मिळत आहे. सायली आणि अर्जुन यांच्यात आता प्रेमळ बंध निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. नवरा बायको म्हणून आता खऱ्या अर्थाने त्यांचा संसार सुरू होणार आहे. सायलीच्या प्रेमात पडलेला अर्जुन आता सायली...