Nagpur, जानेवारी 28 -- नागपूरमध्ये एका १७ वर्षीय तरुणीने गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याआधी तिने इंटरनेटवर 'मृत्यूनंतर काय होते' याचा शोध घेतला होता. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. एका खासगी शाळेत बारावीत शिकणारी ही मुलगी तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील नागपुरातील रिझर्व्ह बँकेत प्रादेशिक संचालक पदावर कार्यरत आहेत. वडिलांच्या म्हणण्यानुसार, ती अनेकदा इंटरनेटवर मृत्यू आणि परदेशी संस्कृतीबद्दल सर्च करत असे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने आधी चाकूने स्वत:वर वार केले आणि ऑनलाइन ऑर्डर केलेल्या 'दगड ब्लेड चाकू'ने क्रॉस मार्क केले. त्यानंतर तिने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केली. सोमवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास छत्रपतीनगर येथील घरातील बेडरूममध्ये ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तिच्या...