भारत, मार्च 15 -- 'महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. परिणामी राज्यात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. संसदीय लोकशाहीची उघडपणे पायमल्ली केली जात आहे. विविध जाती-धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकत असून त्यांच्या मंत्रिमंडळात एक-एक मंत्री एक-एक नमुना आहे, अशी टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकणातील सिंधुदुर्ग येथे केली. येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कोकणाला निसर्ग सौंदर्य व संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे, कोकणच्या या भूमीत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. स. खांडेकरांचा जन्म झाला, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते तुमच...