Jalna, फेब्रुवारी 3 -- Manoj jarange Meet Dhananjay Munde : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण अजूनही तापलेलंच आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मु्ंडे यांच्यावर सातत्याने टीका सुरू असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहेत. त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे हत्या व खंडणी प्रकरणात तुरुंगात आहेत. दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे मला भेटण्यासाठी आले होते, त्यांनी आपली मध्यरात्री भेट घेतल्याचा दावा जरांगे पाटलांनी केला आहे.

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड मला भेटण्यासाठी आले होते, असा दावा जरांगे यांनी केला आहे. मला मराठ्यांनी मोठं केलंय, मलासांभाळा असं मुंडे म्हणाल्याचंही जरांगे यांनी म्हटलं आहे. जरांगे पाटील यां...