New delhi, एप्रिल 23 -- Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीर राज्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पहलगाम फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्यांना कलमा पठण करण्यास सांगण्यात आले. जेणेकरून त्यांच्या धर्माची ओळख होईल. ज्यांनी कलमा पठण केले त्यांना दहशतवाद्यांनी जिवंत सोडले. अशा पद्धतीने दहशतवाद्यांनी आसाम राज्यातील एका हिंदू प्रोफेसरलाही गोळी मारली नाही. कारण ते कलमा पठण करू शकत होते. यामुळे आसाम यूनिवर्सिटीमध्ये बंगाली डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक प्रोफेसर देबाशीष भट्टाचार्य यांचा जीव वाचला.

देबाशीष भट्टाचार्य दहशतवादी हल्ल्यावेळी पहलगाममधील बेसरन खोऱ्यात आपल्या कुटूंबीयांसमवेत उपस्थित...