Pune, फेब्रुवारी 28 -- पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. बलात्काराबरोबरच दरोडा आणि चेन पुलिंगच्या अनेक प्रकरणातही त्याचे नाव समोर आले आहे. त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल असून ज्या बसस्थानकात ही घटना घडली त्या बसस्थानकाजवळ तो अनेकदा वावरताना दिसला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडे हा पोलिस असल्याचे भासवून हा गुन्हा करत होता. त्याच्यावर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१९ पासून एका गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आहे.

स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री गुणाटमधून अटक, असा सापडला तावडीत

गाडे याने २०१९ मध...