भारत, फेब्रुवारी 7 -- महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत घोटाळा करून मतदार यादांमध्ये नवीन नावे समाविष्ट करण्यात आली. विधानसभेपूर्वी मतदार याद्यांमध्ये तब्बल हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येएवढे मतदार अधिकचे टाकण्यात आल्याचा खळबळजनक आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. 'जब एक ही चुटकुला बार बार सुनाया जाए, तो उसपर हँसा नही करते' असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनाही टॅग केले आहे. राहुल गांधी यांचे दावे निराधार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेचा निकाल लागत असून निकालापूर्वी रचल्या जात असलेल्या कथानकाचा हा भाग असल्याचे म्हटले आहे.

नोव्ह...