New delhi, फेब्रुवारी 4 -- महाकुंभातील चेंगराचेंगरी ही काही मोठी घटना नसून ती वाढवून सांगितली जात आहे, असे विधान भारतीय जनता पक्षाच्या खासदार हेमा मालिनी यांनी केले आहे. तसेच या धार्मिक कार्यक्रमाचे उत्तम व्यवस्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येनिमित्त चेंगराचेंगरी झाली होती. उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार या दुर्घटनेत३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले आहेत.

संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, 'आम्ही कुंभमेळ्याला गेलो होतो. आम्ही तेथे स्नानही केले. सगळं व्यवस्थित मॅनेज झालं होतं. ही घटना (चेंगराचेंगरी) झाली हे खरे... एवढं मोठं काही घडलं नाही. ते किती मोठं होतं माहीत नाही. अतिशयोक्ती केली जात आहे. बरेच लोक येत आह...