New delhi, मार्च 6 -- Russia ukraine war: युक्रेन-रशिया युद्ध गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूंच्या सैन्याने वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रांचा वापर केला आहे. नुकताच युक्रेनच्या एका सैनिकाचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात युक्रेनचे सैनिक दारुगोळा संपल्यावर नव्या प्रकारची रणनीती तयार करतात आणि जवळच असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्याचा शस्त्र म्हणून वापर करतात.

एका टेलिग्राम चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ पोक्रिव्स्क शहराच्या ग्रामीण भागातील आहे. ड्रोनने बनवलेल्या या व्हिडिओमध्ये रशियन सैनिक तळघरात लपून बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याचवेळी युक्रेनचे सैनिक तेथे पोहोचतात. तो मधमाश्यांची तपासणी करतो आणि मग त्यांना उचलून तळघराच्या दिशेने धावतो. त्यानंतर तो पोळ्या एका छिद्रातून तळघरात फेकतो आणि तेथून पळून जातो. मात्र, ...