Mumbai, मे 21 -- मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीपुण्यात ब्राह्मण संघटनांसोबत बैठक केल्यानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.पवार म्हणाले की, दवे नावाच्या व्यक्तीने मला फोन करून भेटीसाठी वेळ मागितली होती. यानंतर आपण या बैठकीचे आयोजन केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच कुठल्याही जात-धर्माविरोधात वक्तव्य करू नये,अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिल्या असल्याचेही पवारांनीस्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(NCP Sharad Pawar)हे ब्राह्मण विरोधी राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. दरम्यान अनेक राष्ट्रवादी नेत्यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा ब्राह्मण विरोधी झाल्याचं चित्र दिसत होते. परिणामी शरद पवारांनी पुढाकार घेत ब्राम्हण संघटनांना चर्चेसाठी आमंत्रण दिलं ह...