भारत, फेब्रुवारी 28 -- भारतातील बालसंरक्षण आणि बाल संगोपन प्रणाली मजबूत करण्याच्यादृष्टीने 'कुटुंब-आधारित देखभालीला चालना देणे' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमामध्ये १७ राज्य सरकारे आणि नागरी संस्थांनी सहभाग घेतला होता. तसेच युनिसेफने यूबीएस ऑप्टीमस फाऊंडेशन व ट्रान्सफॉर्म नीव कलेक्टिव्ह, इंडिया अल्टरनेटीव्ह केअर नेटवर्क यांच्यासह सहकार्य केले.

यावेळी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी सांगितले की, 'मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंब हेच सर्वोत्तम वातावरण आहे. असुरक्षित परिस्थितीत वाढणाऱ्या मुलांना व त्यांच्या कुटुंबांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि माझाही प्रायोजकत्व, बाल संगोपन योजना,...