Mumbai, जानेवारी 29 -- Anjali Damania on Dhananjay munde resignation : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुरावे त्यांना दिले होते. त्याचबरोबर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील आर्थिक संबंधाबाबतची माहितीही अजित पवारांना दिली होती. त्यानंतर या भेटीबाबत अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आता आपण केवळ ४ दिवस थांबणार आहोत. त्यानंतर मोठे आंदोलन सुरु करणार असल्याचे तसेच न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

अजित पवारांना कागदपत्रे दिल्यानंतर अंजली दमानिया यांनी माध्यमांना सांगितले की,अजित पवार धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे जे अध्यक्ष असल्याने त्यांना भेटले. कारण त्या प...