Bengaluru, एप्रिल 29 -- Karnataka mob lynching : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. दरम्यान, कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याच्या आरोपावरून जमावाने एका व्यक्तीची बेदम मारहाण करत हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान 'पाकिस्तान झिंदाबाद'चा नारा देणाऱ्या व्यक्तीवर जमावाने संताप व्यक्त करत हल्ला केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी येथे एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात दहा संघ आणि १०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या ...