Mumbai, फेब्रुवारी 12 -- Terror Threat to PM Modi's Aircraft : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रांस दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा फोन मुंबई पोलिसांना मंगळवारी आला. या फोनमुळे खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी चेंबूर येथून एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीची चौकशी सुरू आहे. तसेच पोलिस तपास करत आहेत.

पंतप्रधान मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून त्यानंतर ते अमेरिकेला जाणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यापूर्वी मंगळवारी मुंबई पोलिसांना एक फोन आला. यात मोदी यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होणार असल्याचं सांगण्यात आलं. या फोन कॉलमुळे पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या...