भारत, एप्रिल 12 -- पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी (एपीएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 'नीट' परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सराव परीक्षा व मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये मॉक टेस्ट प्रश्नपत्रिका, तसेच ऑनलाईन लेक्चर्स घेतली जाणार आहेत, अशी माहिती 'एपीएमए'च्या संचालिका डॉ. हिमानी तपस्वी यांनी दिली.

डॉ. हिमानी तपस्वी म्हणाल्या, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची आशा बाळगून 'नीट' परीक्षेसाठी मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुणे शहरात लक्षणीय आहे. मात्र कोचिंग क्लासची फी परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय स्व-अध्ययनावर (सेल्फ स्टडी) भर देतात. नेमका अभ्यास कसा करावा, परीक्षेला सामोरे कसे जावे अशा प्रश्नाना त्यांना तोंड द्यावे लागते....