New delhi, एप्रिल 25 -- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशाचा संताप उफाळून आला आहे. संपूर्ण पाकिस्तान देशातून या हल्ल्याचा सूड घेण्याची भावना व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारही पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेत आहे. पण या प्रकरणामुळे आता राजकारणही तापले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये राऊत यांनी लिहिले की, आज देशाला इंदिरा गांधींची खूप आठवण येते. राऊत यांनी ही टीका पंतप्रधान मोदींना उद्देशून केल्याचे मानले जात आहे. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे गांधी घराण्याचे आणि कॉंग्रेसचे विरोधक मानले जात असले तरी सध्या शिवसेना उद्धव गटाच...